जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट | 28 गावात आढळले तब्बल 85 नवे रुग्ण | वाचा सविस्तर वृत्त..

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी कोरोनाचा विस्फोट झाला.तालुक्यात‌ तब्बल 85 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुका हादरला आहे.गुरूवारी सर्वाधिक ग्रामीण भागातून समोर आले असून 28 गावात नवे रुग्ण सापडल्याने धोका दुप्पट वाढला आहे.तालुक्यातील बिनधास्त नागरिकांमुळे कोरोनोचा उद्रेक झपाट्याने वाढत आहेत.
गुरूवारी करण्यात आलेल्या तपासण्यात जत शहर 17,बिळूर 12 येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याशिवाय अंकले 3,वाळेखिंडी 1,आंवढी 1,वळसंग 1,उमदी 2,अचनहळ्ळी 1,शेगाव 5,


जाडरबोबलाद 3,माडग्याळ 5,लोहगाव 2,येळवी 1,डफळापूर 4,आसंगी तुर्क 1,कोसारी 5,बनाळी 5,रेवनाळ 3,दरिबडची 1,बालगाव 2,अमृत्तवाडी 2,गुड्डापूर 2 असे एकूण 85 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 


तालुक्यातील रुग्ण संख्या यामुळे 2791 झाली असून सध्या 355 रुग्ण उपचाराखाली आहेत.दुसरीकडे 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.