जत तालुक्याला दिलासा बुधवारी 24 रुग्ण | 11 कोरोना मुक्त

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बुधवारी काहीसी कमी झाली.तालुक्यात करण्यात आलेल्या तपासणीत 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अचानक रुग्ण संख्येत वाढ झाल्याने चिंता वाढली होती.मात्र बुधवारी काहीसा दिलासा  मिळाला.तालुक्यातील जत शहर 14,येळदरी 1,वळसंग 1,जिरग्याळ 2,दरिकोणूर 1,उमराणी 1,संख 1,रामपूर 1,बनाळी 2 असे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात 11 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तालुक्यात पुन्हा एका रुग्णाचा कोरोना मुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे. तर सध्या तालुक्यात 296 जण उपचाराखाली आहेत.