दरिबडची खून प्रकरणातील दोघा संशयितांना 22 मार्चपर्यत कोठडी

जत,संकेत टाइम्स : दरीबडची (ता.जत) येथील वीस वर्षीय धनाजी भागप्पा टेंगले या तरूणांच्या खून प्रकरणातील संशयित दोघाना जत न्यायालयाने 22 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरिबडची येथील नातेसंबंधातील मुलीचा नाद सोडावा म्हणून संशयित राजू लेगरे व आदिनाथ हाक्के (रा.पांढरेवाडी) या दोघांनी मिळून धनाजीचा खून केल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी,संशयित यांच्या नात्यातील‌ मुलीशी मयत‌ धनाजी टेंगले यांचे प्रेंम संबध होते,ते तोडावेत म्हणून संशयित व टेंगले यांच्यात वादावादी झाली होती.तरीही टेंगले यांनी त्या मुलीचा नाद सोडला नाही म्हणून संशयित राजू लेंगरे, आदिनाथ हाक्के यांनी गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान गावातून दुध घालून घरी निघालेल्या धनाजी टेंगले यांचा धारदार शस्ञाने वार करून व दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली होती.


पोलिसांनी गतीने तपास करत दोघा संशयिताच्या मुसक्या आवळत‌ ताब्यात घेतले होते.नात्यातील मुलीशी मयत टेंगले यांने प्रेम संबध तोडले नसल्याच्या रागातून संशयित दोघाने हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोघांना अटक करत शनिवारी जत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशयित दोघांना 22 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान पोलीस संशयिताकडे कसून चौकशी करत आहेत.अन्य कोनाचा सहभाग आहे का?या दृष्टीने पोलीसाकडून तपास सुरू आहे.अधिक तपास उपनिरिक्षक महेश मोहिते करत आहेत.