गुढीपाडव्याला व्यवसायिकांना 2 कोटीचा फटका

जत,संकेत टाइम्स : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या गुढीपाडव्याशी तुलना करता यंदा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना एकूण 2 कोटींचा फटका बसला आहे.तालुक्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ, घरबांधणी व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून यादिवशी नव्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला कोरोनाने धक्का दिला आहे. वाहन क्षेत्र वगळता सराफ व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे.