जत तालुक्यात शुक्रवार 161 नवे रुग्ण | पुर्व,उत्तर,दक्षिण भागाची चिंता वाढली,पश्चिम शुक्रवारीही सुरक्षित

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचे पुन्हा दीड शतकावर रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून जत शहरासह तालुक्यातील पुर्व,उत्तर,दक्षिण भागातील गावात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.तर पश्चिम भाग पुन्हा सुरक्षित ठरला आहे.


शुक्रवारी जत पश्चिम भागातील डफळापूर सह परिसरातील 
17 गावात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.नागरिकांच्या हालगर्जीपणा काही प्रमाणात रुग्ण वाढीस बळ देणारा ठरत आहे.तालुक्यात शुक्रवारी 161 नवे रुग्ण आढळून आले आहेत, यामुळे जत तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4250 झाली आहे.


तालुक्यातील 42 रुग्ण शुक्रवारी कोरोना मुक्त झाले आहेत.तर शुक्रवारी तालुक्यातील एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.सध्या तालुक्यातील 1158 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 980 रुग्ण सध्या होम आयसोलेशन मध्ये आहेत. नवे रुग्ण असे जत 16, वाळेखिंडी 1,बिळूर 15, मेढेगिरी 3, अचकनहळळी 9, संख 1, उमदी 2, को .बोबलाद 4,वळसंग 1, शेगाव 14,
माडग्याळ 4, जा .बोबलाद 1, सनमडी 1, पाच्छापूर 1,उमराणी 14,गुळवंची 11, सोन्याळ 5, खैराव 2, येळवी 2, सोर्डी 1, दरिकोणूर 3, घोलेश्वर 1, जाल्हाळ बु 2, गुगवाड 5,तिकोंडी 3, टोणेवाडी 1, खंडनाळ 1, कुंभारी 2, अमृतवाडी 1, आसंगी तु 1, कोसारी 1,रेवनाळ 1, खोजानवाडी 1, मोरबगी 1, रामपुर 1, बागेवाडी 1,सुसलाद 1, कोणीकोणूर 5,
मोटेवाडी दरिबडची 4, वज्रवाड 4, बोर्गी बु 4, वाषाण 1, जाल्याळ बु.5,कवठे महांकाळ 1,लवंगा 1,असे 161 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात जत शहर,बिळूर,अचकनहळ्ळी,शेगाव,उमराणी,गुळवंची,येथे रुग्ण संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.