जत तालुक्याला दिलासा,तरीही 12 गावात आढळले नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याला रविवारी काहीसा दिलासा मिळाला.रविवारी करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासण्यात तालुक्यातील  23 तर इतर तालुक्यातील 7 व कर्नाटकातील 2 असे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झालेला आहे.दररोज 40 ते‌ 50 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.
रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही 12 गावात नवे रुग्ण आढळून आले आहेत.
जत शहरासह स्थानिक ग्रामपंचायती,नगरपरिषद पोलीसाकडून सतर्कता बाळगली जात आहे. विना कारण,विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई कडक करण्यात आल्याने संचार बंदीचा काटेकोर अमल होत आहे.परिणामी काहीअंशी रुग्ण संख्या खालावताना दिसत आहे. पुढील काही आठवडे अशा पध्दतीने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. तरचं तालुक्यातील कोरोना विस्फोट कमी होणार आहे.
दरम्यान रविवारीच्या तपासणीत जत शहर 6,बिळूर 1,अचनहळ्ळी 5,उमदी 2,पाच्छापूर 1,येळवी 1,डफळापूर 1,रेवनाळ 1,खोजानवाडी 1,उंटवाडी 1,दरिकोणूर 1,दरिबडची ‌1,धुळकरवाडी 1 असे जत तालुक्यातील 23 तर कर्नाटक 2,मंगळवेढा 4,भोसे 1,घेरडी 1,पंढरपूर 1 असे अन्य तालुक्यातील 9 रुग्ण जतेत तपासणीत आढळून आले आहेत.
तालुक्यातील पुन्हा एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे. तर तालुक्यात रविवारी 21 जणांनी कोरोनावर यशस्वी मात‌ केली आहे. तालुक्यात सध्या 400 जण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी  306 जण होम आयसोलेशन मध्ये‌ आहेत.तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी स्व:तासह कुंटुंबाची काळजी घ्यावी,विना कारण घराबाहेर पडू नये,मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापर करावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.