सांगलीत कोरोनाचा विस्फोट,10 जणाचा मुत्यू | जिल्ह्यात नवे 762 रुग्ण | जत तालुक्यातील 26 जणाचा समावेश

सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना चा विस्फ़ोट सुरु असून आता मृत्यूचे देखील तांडव सुरु झाले आहे.बुधवारी दिवसभरात सांगली जिल्ह्यात 10 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.गेल्या आठ दिवसांत कोरोनामुळे सुमारे पन्नास नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.सांगली जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे.बुधवारी दिवसभरात उच्चांकी 762 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने केलेल्या सर्व सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रुग्ण वाढीबरोबर आता उपचारादरम्यान बळी जाणारांचा आकडा वाढत आहे.बुधवारी सर्वाधिक म्हणजे 10 जणांचा उपचारा‌ दरम्यान बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या मध्ये खानापूर 3, कडेगाव 2, मिरज 2, पलूस 2, आणि वाळवा तालुक्यात 1 असे एकूण 10 जणांना प्राण गमवावा लागला.
बुधवारी दिवसभरात आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी 60, जत 26, कडेगाव 52 कवठेमंहकाळ 41, खानापूर 89, मिरज 69, पलूस 31, शिराळा 49, तासगाव 82, वाळवा 65, तसेच सांगली शहर 165 आणि मिरज शहर 65 असा सांगली जिल्ह्यातील 762 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सद्या 4 हजार 869 रुग्ण उपचाराखाली आहेत.