कोसारीच्या सहा जणाविरूध अँट्रासिटी गुन्हा दाखल

जत,प्रतिनिधी : कोसारी ता.जत येथे जमिनीच्या वादातून तिघांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 6 जणावर जत पोलीसानी गुन्हा दाखल झाला आहे.घटना सोमवार (ता.7) कोसारी येथे घडली.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,फिर्यादी रावसाहेब राजाराम हेगडे व विशाल नानासो जाधव व अन्य जाधव बन्धूत शेतीच्या कारणावरून वाद आहे.

त्यातून सोमवारी ता.7 झालेल्या वादावादीतून रावसाहेब हेगडे,त्याची आई मंगल हेगडे,भाऊ भाऊसाहेब हेगडे (सर्व जण रा.कोसारी) यांना विशाल जाधव,बबन सुबराव जाधव,अरूण रावसाहेब जाधव,राजू बबन जाधव,पांडूरग रमेश जाधव,नानासाहेब सुबराव जाधव यांनी लाथा बुक्या,काठीने मारहाण करून जखमी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीसांनी सहा जणाविरूध मारहाण,जातीवाचक शिवीगाळ याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास डिवायएसपी रत्नाकर नवले करत आहेत.