बस्तवडेत‌ भीषण स्फोटात दोघे ठार,एक जखमी

तासगाव : तासगावच्या पूर्व भागातील बस्तवडे गावाजवळील डोंगरात भीषण स्फोटात दोघे ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.भिषण आगीत दोन ट्रकही जळून जागीच जळून खाक झाले आहेत.
बस्तवडेत डोंगर फोडुन सपाटीकरण चालू जिलेटिन कांड्याचा  स्पोट झाल्याने झाल्याने अवघा तासगाव ‌तालुका हादरून गेला आहे. तब्बल दहा किलोमीटर अंतरावर यामुळे हादरे बसले आहेत.तासगाव पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे.