ड्राय डेला दारू विक्री : एकास अटक

जत,प्रतिनिधी : ड्राय डे असतानाही बेकायदा दारू विक्री करताना एकास जत पोलीसांनी एकास अटक केली.संभाजी बाबुराव शिंदे (रा.तिप्पेहळ्ळी,वय 33) असे‌ ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,
जत शहरातील संभाजी पॅलेस जवळ 'ड्राय डे' असतानाही संभाजी शिंदे हा बेकायदा दारू विकत असल्याचा संशय पोलीसांना आल्याने त्यांची झडती घेतली असता,त्याच्या जवळ 600 रुपयांच्या देशी विदेशी दारूच्या 4 बॉटल, 600 रुपयांच्या मॅक्डोल कंपनीच्या 4 बॉटल व 680 रुपये किंमतीच्या रॉयल स्टँगच्या 4 बॉटल असा एकूण 1880 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.कणसे,पो.ना. पाटील,पो.ना.केरबा चव्हाण,पो.ना.मासाळ यांनी ही कारवाई केली.