मोटारसायकल चोरटे ताब्यात

सांगली : विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयित आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले.संतोष श्रीशैल बिराजदार,वय 22,रा.श्रीराम गल्ली नं.16 कुंभारमळा,हसनेआश्रम रोड, सांगली,सुरज विकासा साळवी, वय 20, रा.श्रीराम गल्ली नं. 4 कुंभारमळा असे अटक केलेल्या संशयिताची नावे आहे.


त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतून नदीम मंहम्मद पठाण, रा. फ्लॅट नं.16, कोरे सिल्व्हर अपार्टमेंट,100 फुटी रोड सांगली येथून दुचाकी चोरल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा दुबुले,उपविभागिय पोलीस अधिकारी अजित टिके, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यापथकाने हि कारवाई केली.