मुजविलेले खड्डे दोन दिवसात उखडले

जत,प्रतिनिधी : गेल्या दोन महिन्यापुर्वीच्या पावसाने जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केलेल्या रस्ते कामाचे सत्य चव्हाट्यावर आणले होते.नव्याने केलेल्या रस्त्यासह जवळपास सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यातील काही रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सध्या सुरू आहे.मात्र खड्डे भरतानाही भ्रष्ट कामाचा पुन्हा प्रत्यय वाहनधारकांना येत आहे.
खड्ड्यात थेट दगड टाकत त्यावर डांबराचा फवारा मारून मुजविलेले खड्डे एक-दोन दिवसात पुन्हा उखडत असून मातीत टाकलेले खड्डी पुन्हा उखडून वर्ती येत आहे.याकडे जतचे उंटावरून शेळ्या राखणारे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर किंबहुना आर्थिक लाभामुळे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे दर्जाहीन कामे करण्याची सवय लागलेले ठेकेदार खड्ड्यात दगडे टाकून त्यावर डांबराचा फवारा किती मारतात.हे खड्डी वर्ती असलेल्या ठिकाणी स्पष्ट होत आहे.खड्डीवर डांबर लागलेच नसल्याचे स्पष्ट होत असून नेमके नुसतीच खड्डी टाकून खड्डे मुजविण्याचा निंदनीय प्रकार जत तालुक्यात अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत घडत आहे.त्यामुळे खड्ड्यातून मुक्ती हे जतकरांचे दिवा स्वप्न ठरणार आहे.


जत तालुक्यात भरण्यात आलेल्या खड्ड्यातील खड्डी उखडली आहे.