भारत बंदला समिश्र प्रतिसाद | जतसह प्रमुख गावात कडकडीत बंद ; निषेध, कायद्या पत्रकाची होळी

0



जत,प्रतिनिधी : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवारी जत तालुक्यासह सांगलीत जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी उघडणारी दुकाने पूर्णपणे बंद होती.काही मोजक्याच दुकानदारांनी व्यवहार सुरू केला होता. पण नंतर तोही कॉग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या रँलीनंतर

बंद केला.मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.जत शहरातील बाजार समितीमध्ये भाजपा सरकार व काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला.राष्ट्रवादी कॉग्रेसकडूनही तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.








ग्रामीण भागातील काही ठिकाणी अपवाद वगळता सर्व सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.जत,डफळापूर, संख,उमराणी,शेगाव,उमदी, बिळूर आदी ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला.केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. या बंदला शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती.शहरातील मंगळवारचे  बाजार बंद करण्यात आले होते.व्यवसायिक, पानपट्टीचालकांनीही बंदमध्ये भाग घेत व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते.

आंदोलनात आमदार विक्रमसिंह सांवत,तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग,नाना शिंदे,भूपेंद्र कांबळे,निलेश बामणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.







डफळापूर : येथे दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यात आला. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. हणमंत कोळी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश घागरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सागर चव्हाण, गौस मकानदार,अतुल शिंदे, माजी सभापती शिवाजी गडदे व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.दरम्यान जत तहसील कार्यालयावर शेतकरी विरोधी कायद्या विरोधात घोषणा देत परिपत्रकाची होळी करण्यात आली.जत तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने निदर्शने ही करण्यात आले.





Rate Card





शेगाव : शेगाव ता.जत येथे भारत बंदला सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेऊन शंभर टक्के प्रतिसाद देण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता प्रमुख बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती.सर्वत्र शुकशुकाट होता.








संख : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद लाभला सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.









जत तालुक्यातील शेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.