येळवीतील एकाची आत्महत्या

जत,प्रतिनिधी : येळवी ता.जत येथील 45 वर्षीय इसमाने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सुनिल गंगाराम लांडगे रा.येळवी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, सुनिल लांगडे यांनी गुरूवारी सकाळी साडेबाराच्या दरम्यान घरात कोन नसताना गळपास लावून घेतला,काही वेळानंतर कुंटुबातील अन्य लोक आल्यानंतर त्याला खाली उतरवत जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र तत्पुर्वीच त्यांचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घटनेची फिर्याद ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलीसात दिली आहे.