ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा‌ कर्नाटक सरकार करणार गौरव | तम्मणगौडा रविपाटील यांची माहिती

जत,प्रतिनिधी : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या रणजितसिंह डिसले यांना यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत,त्यांचा कर्नाटक सरकारकडून मुख्यमंत्री एस.येडियुरप्पा यांच्याहस्ते बेंगलोर येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदचे माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांनी दिली आहे.

युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो.सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात,या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात रणजितसिंह डिसले यांचंही नाव होतं.या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 10 शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं आहे.सोलापुरातील वर्चेवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठीत मातृभाषेतून कन्नड भाषेत शिकवले गेले.  त्याला सॉफ्टवेअर अभियंता व्हायचे होते, आणि शिक्षक म्हणून त्यांचे कार्य वडिलांच्या इच्छेप्रमाणेच कौतुकास्पद होते.  जेव्हा कन्नड विद्यार्थी कन्नड भाषेच्या सीमेवरील मराठी मध्ययुगीन कन्नड शाळांमध्ये आले नाहीत, तेव्हा शालेय भाषेचा कन्नड भाषांतर करणे आणि व्हिडिओ व इतर तंत्रज्ञानाद्वारे कन्नड शिकविणे हे त्यांचे काम यशस्वी ठरले, कारण केंद्र सरकारच्या "सर्जनशील संशोधक" कडून यापूर्वीच त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत.या रकमेचा उपयोग सीमापार शांतता राखणा-या विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांना आदर आणि काळजी दाखविण्यासाठी केला जाईल असे त्यांनी घोषित केले आहे.सीमा विकास प्राधिकरणाच्या सीमेवरील श्री.डिसले यांच्या कन्नड सेवेचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा,सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण कर्नाटक सरकारचे‌ अध्यक्ष डॉ.सी.सोमशेखर आयएएस (एन),सचिव प्रकाश मत्तीहळी यांनी कौतुक केले आहे.


श्री.डिसले यांनी केलेल्या कार्याचा कर्नाटक सरकारकडून त्यांचा‌ भव्य सत्कार करून गौरव करण्यात येणार आहे. सोलापूरहून श्री.डिसले सर यांना बेंगलोर येथे नेहण्याची जबाबदारी माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कर्नाटक सरकारकडून तारिख मिळताच‌ आम्ही बेंगलोर येथे‌ जाणार आहोत,असेही रविपाटील यांनी सांगितले.