आंवढी ग्रामपंचायत इमारतीच्या दर्जाहीन कामाची तपासणी करा ; अंकुश शिंदे यांचे निवेदन

आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथील
नवीन ग्रामपंचायत इमारतीचे निकृष्ट बांधकाम होत असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी अंकुश तात्यासो शिंदे यांनी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आवंढी येथे ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते निकृष्ट होत आहे.बांधकामासाठी ओढ्यातील करलमाती मिश्रीत वाळु वापरण्यात येत आहे.तसेच क्रश सॅन्डच्या मातीसारखी वाळुचा वापर सुरु आहे.त्याशिवाय बांधकामासाठी कमी दर्जाचे स्टीलचा वापर केला जात आहे. सदर काम पाहण्यासाठी संबधित विभागाचे अभिंयते,अधिकारी हजर नसतात.
इमारतीचे काम मुख्य ठेकेदार सोडून सब ठेकेदार म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी काम करत आहेत.बांधकामावर पाणी मारण्यात हलगर्जी पणा होत आहे. असेच काम झाल्यास इमारत जास्त काळ टिकू शकणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्याशिवाय या कामाची गुणनियत्रंक विभागाकडून तपासणी करण्यात यावी,अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.