शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदमध्ये सांगली जिल्हा बंद राहणार;पृथ्वीराज पाटील

सांगली : केंद्रातील मोदी सरकारने देशातल्या शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादलेले आहेत, हे कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी आणि विविध संघटनांनी मंगळवार, दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. हा बंद पूर्णपणे यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.


केंद्राने शेतकऱ्यांविरोधात केलेले काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आणि देशभरातील शेतकरी नवी दिल्लीत 26 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात लाखो लोक सहभागी झाले आहेत. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस पक्षाने गेले 3 महिने या कायद्या विरोधात आंदोलने केली आहेत.