विट्यात वाहनचोरी,घरफोडीतील एक आरोपी जेरबंद

जत : पुणे,सातारा,विटा परिसरात घरफोडी,वाहनाची चोरी करणाऱ्या एका चोरट्यास विटा पोलीसांनी ताब्यात घेतले.चंद्रशेन गोविंद जाधव रा.चंद्रशेखर नगर विटा असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, ता.14 रोजी संशयित चंद्रशेन जाधव हा विटा बाजारपेठेत चोरीचा लँपटॉप व मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती,त्याआधारे सापळा लावून संशयित चंद्रशेन जाधव याला ताब्यात घेत कसून तपास केला असता,त्याने विटा पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या,पुणे येथून एक चारचाकी,2 मोटारसायकल,तर कराड येथून दोन मोटारसायकली चोरल्याचे कबूली पोलीसांना दिली आहे. 


त्याशिवाय त्यांच्याकडे अजून कसून तपास सुरू असून अजून काही चोऱ्याचा छडा लागण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.
पो.अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.रविंद्र शेळके यांच्या पथकाने केला.