आत्महत्या.! विचार बदलण्याची गरज..

डॉ.शितल आमटे यांच्या आत्महत्येची बातमी मनाला सुन्न करून गेली.आतापर्यत शेतकरी आत्महत्येचा चर्चा आपण ऐकत होतो,आता डॉ.आमटे,अभिनेता सुशांतसिह,संखमधील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.सदाशिव व्हंनकडे अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तीच्या आत्महत्या विचार करायला लावणाऱ्याआहेत.प्रसिद्ध,लोकहितासाठी जीवन झोकून काम करणाऱ्या,वैचारिक आमटे कुंटुबांतील व्यक्तीची आत्महत्या अनेक गोष्ठीचा उलघडा करणारी आहे.


मुळात ईश्वराने दिलेले सुंदर जीवन नाकारून मनुष्य आत्महत्येकडे प्रवृत्त होतोच कसा?वैद्यकीय शास्ञानुसार आत्महत्येचा विचार मनात येणे,हे कुमकुवत किंवा विकृत्त मनोवृत्तीचे लक्षण आहे.भौतिक प्रगती,तंत्रज्ञानाने प्रगत झालेली सुख साधणे,मनुष्याचे मन कुमकुवत करत आहेत.छोटासाही ताण आता सहनशीलते पलिकडे जात आहे.त्यातून आत्महत्येचे विचार पुढे येताना दिसतात.आतापर्यत जग बुध्दिमत्ता,कोशांक (IQ - intelligence Quotient)बोलत होते.पंरतू आता सर्वत्र भावनात्मक कोशांक म्हणजे( Emotional
Quotient-EQ)बद्दल बोलले जात.EQम्हणजे मनातील भावनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता..
तुमचा EQ चांगला असेलतर परिक्षेत उज्वल यश मिळविता येते.विपरित परिस्थितीतही भावना नियंत्रित ठेवता येते.साधारणपणे आत्महत्येचा विचार हे वैफल्याचे,नैराश्याचे आहे.मनामधील वैफल्य,निराशा,आशादायी प्रवृत्ती नष्ट होते.अशा व्यक्ती नकारात्मक विचार करतात!आत्महत्या सारखे विचार टाळण्यासाठी कायम सकारात्मक विचार करावेत.एकादी घटना वरपांनी कितीही निरासाजनक वाटली तरी त्यात कुठेतरी आशेचा किरण दडलेला असतोच,आणि तो शोधण्यासाठी बालवयातच सवय बिंबविणे महत्वाचे आहे.प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असतेचं.
जीवनात प्रत्येक व्हिजनला चार पर्याय ठेवून वाटचाल करावी.जेणेकरून एकादा पर्याय फसला तर अन्य पर्याय उपयोगी ठरतील.त्यामुळे दडपणही येणार नाही.नैराश्याचा सामना करावा लागणार नाही.


व्यायामाची सवय; आपलं शरिर आणि मन हे एकमेकांपासून मुळीच वेगळे नाहीत.ते एकमेकांना जोडलेले आहेत.त्यामुळेच मनाचा शरिरावर व शरिराचा मनावर परिणाम जाणवतो.म्हणूनच व्यायाम त्याला मजबूत करू शकते.मनूष्याच्या मांसपेशी मजबूत झाल्या की मन मजबूत होतेच.म्हणून स्वामी विवेकानंदानी सांगितल्याप्रमाणे भगवत् गीतेतील गहन तत्वज्ञान तुम्हाला समजून घ्यायचे असेलतर तुम्ही फुटबॉल खेळेले पाहिजे.मैदानावरील खैळ थांबल्याने मुलांच्यात बालवयात व्यसनाधिनता वाढली आहे.लहान वयापासून मैदानी खैळ,व्यायाम,योगासने,शरिरासोबत मन सदृढ करतात.सदृढ मन जीवनातील ताण-तणाव ते सहज सहन करू शकतील.
मनुष्य जीवन हे दुर्मिळ आहे.दुर्लभ आहे ते सुंदर आहे.जीवनातील एखादाच प्रश्न डोक्यात धरून ठेवण्यापेक्षा न सुटणारे प्रश्न सोडून देऊन,जीवनाच्या सुंदरतेचा आस्वाद घ्यायला बालवयातच मुलांना शिकविले पाहिजे.भावनेच्या ओघात वाहत न जाता भावनेवर नियंत्रण ठेवायला शिकविले पाहिजे.लहानपनापासून सकारात्मक विचार करण्याची विविध पर्याय ठेवणाऱ्या संतुलित विचार सरणीची,तसेच शारिरिक व्यायाम करण्याची सवय लावणे हि काळाची गरज आहे.आपला सकात्मक विचारचं आत्महत्या टाळू शकेल.
- डॉ.सरिता शालिवाहन पट्टणशेट्टी
बालरोग तज्ञ,
मयुरेश्वर हॉस्पिटल,जत