बागेवाडीत डेंग्यू चे थैमान; एकाचा मृत्यू

जत: तालुक्यातील बागेवाडी येथे डेंग्यू साथीने अक्षरशः थैमान घातले आहे.  डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाला तर आणखी दहाजणांना डेंग्यू ची लागण झाली आहे.  ग्रामपंचायत,आरोग्य यंत्रणा व प्रशासन मात्र सुस्त आहे. 
बागेवाडी गावी मागील दहा दिवसांपासून डेंग्यू ची साथ सुरू आहे.डेंग्यूमुळे सोपान बापू वाघमारे, वय 82 या जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला.


तर गावातील आणखी नऊजणांना डेंग्यूची लागण झाली.एका महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने जत येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूची साथ सुरू असताना बागेवाडी ग्रामपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.धूर फवारणी करण्यात आली नाही.

मशिन बंद पडले असल्याचे ग्रामसेवक बालम मुजावर यांनी सांगितले.गावात साथीचा प्रादूर्भाव वाढतच असून आणखी काहीजणांना थंडी तापाची लक्षणे दिसत आहेत.आरोग्य विभाग व प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


ग्रामपंचायत,आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे बागेवाडीत डेंगू चे थैमान माजले आहे.वारवांर सांगूनही स्वच्छता,औषध फवारणी केली जात नाही.त्यांच्या चुकीचा फटका नागरिकांना बसला आहे.माझे वडीलांचा डेंगू झाल्यामुळे मुत्यू झाला आहे.ग्रामपंचायत,आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना केली असतीतर कदाचित ही घटना घडली नसती.

दिनराज वाघमारे,
जेष्ठ पत्रकार,बागेवाडी,जत