ग्रामपंचायत निवडणूकीला मोर्चेबांधणी | तयारीला वेग ; वरिष्ठ नेत्यांकडून चाचपणी

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावपातळी वरील स्थानिक पुढाऱ्यांपासून विविध पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळी गावावर कब्जा मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत.

या निवडणुकांसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसल्याने मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमुळे गाव पातळीवरील पक्षीय युती,आघाड्या व पॅनल बनवण्यासाठी राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात होणार आहे. 








राज्य सरकारने कोरोनाच्या महामारीमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करून निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.सध्या ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाल्याने या निवडणुकीच्या हालचालीला वेग आला आहे.विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यातील 123 ग्रामपंचायतीपैकी 30 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगूल पुन्हा वाजणार असल्याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी या निवडणुकांमधून होणार आहे.










तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाबरोबरच प्रभाग रचनेनुसार भाव- भावकी, स्थानिक पक्षविरहीत आघाड्या, जातीचे समिकरणानुसार आघाड्या-युती केल्या जातात. परंतु सध्या तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकापासून राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याने तालुकास्तरावरील नेतेमंडळी प्रमाणे स्थानिक गाव पुढारीही एकत्रित येतील का याकडेच लक्ष लागले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकात कोणत्या पक्ष्याच्या आघाड्या होणार याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण वाटत असले तरी गावपातळीवरील स्थानिक राजकारणाचा प्रभाव अधिक दिसुन येत असतो.


Rate Card









ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाला असला तरी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.सरपंच पदाच्या सोड तीनंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी वेग येणार आहे.सध्यातरी प्रभाग रचने नुसार होणाऱ्या आरक्षणाप्रमाणेच  निवडणुकीच्या इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत.









या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणूका


अंकलगी,अंकले,भिवर्गी, धावडवडी, डोली,घोलेश्वर, गुड्डापूर, गुगवाड, जालिहाळ खुर्द, करेवाडी (ति),कुडनूर, कुलालवाडी, लमाण तांडा उटगी,लमाण तांडा दरीबडची,मेंढीगिरी, मोरबगी, निगडी बुद्रुक,सनमडी,शेडयाळ,शेगाव, सिद्धनाथ, सिगनहळ्ळी,सोनलगी, तिकोडी, टोणेवाडी,उमराणी, उटवाडी, उटगी,वळसंग व येळदरी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.