विजापूर-गुहागर महामार्गावर खाजगी वाहनाचा तळ

विजापूर-गुहागर महामार्गावर खाजगी वाहनाचा तळ


जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गाचे अनेक दिवसानंतर काम करण्यात येत आहे,मात्र नव्याने करण्यात आलेल्या हा मार्ग अवैध वाहने पार्किंगचे अड्डे बनत आहेत.थेट रस्त्यावर खाजगी वाहने उभी करून वाहतूकीला अडचण निर्माण केली जात आहे.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेले पोलीस कर्मचारी दिवसभर नेमके कोणत्या कामगिरीवर असतात,यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे.