अनेक ग्रामपंचायतींकडून दिव्यांगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ

जत,प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्तींसाठी 2012 पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून अनेक ग्रामपंचायतींना दिव्यांगाचा निधी वाटप करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.तर काही ग्रामपंचायतीत या दिंव्याग निधीचा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. एका गावात थेट दुचाकी देण्याचा प्रकार झाला आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी 2012 पासून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून जत तालुक्यातील अनेक ग्रामसेवक दिव्यांगाना जाणूनबूजून निधी वाटप करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

यातील अनेक ग्रामपंचायतीने 2012 पासून आजपर्यंत एकवेळ ही निधी वाटप केला नाही असे सांगण्यात आले या आर्थिक वर्षात तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त निधी वाटप करणे गरजेचे होते. आणि ग्रामपंचायतीमध्ये अपंगांची नोंदणी करण्याचा कायदा असूनही त्याची तालुक्‍यातील बहुतांश ग्रामपंचायतीत अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत अपंगाचे सध्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण सुरू आहे.असे असताना ग्रामपंचायतींनी राखीव निधीतून वाटप करण्याची मागणी दिव्यांग नागरिक ग्रामपंचायतकडे करीत आहेत.जत तालुक्यात 126 ग्रामपंचायत अस्तित्वात असून यातील अनेस ग्रामपंचायतीने अपंगांना निधीचे वाटप केले नसल्याचे सांगितले जाते या संदर्भात कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर हे निधी वाटप केली नाही अशा ग्रामपंचायतीवर व अधिकारी यांच्यावर काय कार्यवाही करतील आणि अपंगांना न्याय देतील अशी आशा लाभार्थी बाळगून आहेत.