सोपान वाघमारे यांचे निधन

जत,प्रतिनिधी : जत तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष, जय भारत न्युज चॅनेलचे संपादक,जेष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांचे वडील सोपान बापू वाघमारे वय 82,रा.बागेवाडी ता.जत.यांचे नुकतेच सांगली येथे खासगी हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू असताना दुखःद निधन झाले आहे.सोपान वाघमारे यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोपान वाघमारे हे श्रीसंत बाळू मामांचे भक्त व पुजारी होते.सोपान वाघमारे यांच्या अकस्मात जाण्याने वाघमारे कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यातून त्यांना लवकर बाहेर पडण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना.वाघमारे पार्थिवावर अंत्यसंस्कार सोमवार दि.7 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 वाजता बागेवाडी (ता.जत) येथे करण्यात येणार आहे.