जीवन आंनदी जगा ; सिध्देश्वर स्वामीजी | माडग्याळमध्ये प्रवर्चन

माडग्याळ, वार्ताहर : करुणासागर गुरू हा सर्वांना आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आहे. कशाचाही मोह न बाळगणारा आहे,असे उद्गार विजापूर ज्ञानयोगी मठाचे सिध्देश्वर स्वामीजी यांनी केले.माडग्याळ ता.जत येथे सिध्देश्वर स्वामीजी यांचे प्रर्वचन संपन्न झाले.यावेळी गुरूदेव आश्रमाचे डॉ.अमृतानंद‌ स्वामीजी,गोंधळेवाडी मठाचे हभप ‌तुकाराम महाराज उपस्थित होते.


सिध्देश्वर स्वामीजी पुढे म्हणाले,पापकर्माचा लवलेश स्वप्नातील मनातही न आणणारा आहे, परम पुण्यमयी असा सद्गुरू नित्य माझ्या मनी राहो! अगदी शब्दश: गुरुंप्रति भावनेशी एकरूप जीवन सिद्धेश्वर स्वामी तंतोतंत जगताहेत. 

अधात्मातील अनेक विषयाची माहिती देत‌ जीवन स्वच्छ, निरोगी,सत्यता बाळगत जगा,देवाने आपल्याला दिलेल्या शरिराचा चांगला उपयोग करा,असेही सिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितले. 
गावातील ऐतिहासिक महादेव मंदिराला सिध्देश्वर स्वामीजी यांनी भेट देत ग्रामस्थांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.

माडग्याळ ता.जत‌ येथे प्रर्वचन सांगताना ज्ञानयोगी सिध्देश्वर स्वामीजी