डोर्लीत तलाठ्यावर कारवाईची मागणी

जत: डोर्ली (ता.जत) येथील गावकामगार तलाठी अशपाक मुजावर हे गावात येत नाहीत,ग्रामस्थांना उतारे देणे व इतर कामे उमेदवारामार्फत करत आहेत. उताऱ्यावर सही घेण्यासाठी ग्रामस्थांना वरचेवर जत येथे हेलपाटे मारावे लागतात. त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी
तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तलाठी अशपाक मुजावरहे वारसा नोंद, खरेदी दस्ताच्या नोंदीसाठी व इतर नोंदीसाठी पैशाची मागणी करुन शेतकऱ्यांची
आर्थिक लूट करत आहेत. कामासाठी आलेल्या ग्रामस्थांना उर्मट भाषेत बोलून वारंवार अपमानीत करत आहेत. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांसमोर एकेरी भाषेत उध्दटपणे बोलून शासकीय कार्यालयात अपमानीत करत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे त्यांनी केले होते; परंतु ते ग्रामसेवक यांच्याकडे दिले नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी करुन आठ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास तहसीलदारकार्यालयासमोर उपोषण मनसे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी, जत शहर अध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर, शरद चव्हाण, दिनेश सांळुखे, नामदेव यादव यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
करू.