यावर्षीचे वारणेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान होणार नाही ; आ.विनय कोरे

शिराळा : विश्वनाथ तथा तात्यासाहेब कोरे यांच्या 26 व्या पुण्यस्मरणार्थ होणाऱ्या भव्य अंतरराष्ट्रीय वारणा कुस्ती मैदान यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अखेर रद्द करण्यात आले आहे.गेले अनेक वर्ष वारणेच्या मैदानात पैलवानांचा कुंभमेळा भरला जात होता. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जागतिक लेव्हलचे पैलवान या कुस्ती मैदान साठी हजेरी लावत होते.संपूर्ण महाराष्ट्रात खासबाग मैदानानंतर वारणे मध्ये त्याच तोडीचे मैदान विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत होते. प्रत्येक वर्षी होणारे 13 डिसेंबरचे कुस्ती मैदान यावर्षी रद्द केल्याची माहिती माजी मंत्री आमदार डॉ.विनय कोरे (सावकार) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.गेली दहा महिने झाली कोरोणाचे संकट अवघ्या जगावर पसरले असताना, अजून या आजारावर लस उपलब्ध नसल्याने आमदार विनयजी कोरे यांनी हा निर्णय घेण्याचे ठरवले.


छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कुस्तीला राजाश्रय जर कोणी दिला असेल तर या महाराष्ट्रात माननीय माजी मंत्री विनयजी कोरे (सावकार) यांचेच नाव पुढे येतं.खरं पाहता 2020 हे साल संपूर्ण जगाला तसं वाईटच गेले. त्याच बरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा ते दुःखाचेच गेले. कारण  याच वर्षी आदरणीय मातोश्री आईसाहेब शोभाताई कोरे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.  त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावरती व कोरे कुटुंबां वरती दुःखाची शोककळा पसरली.त्याच बरोबर कोरे साहेबांचे जिवाभावाचे सवंगडी व संपूर्ण कुस्ती मैदानावर नियंत्रण ठेवणारे  साहेबांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते पै. प्रकाश पाटील यांचेही कोरोनाने निधन झाले. एवढं मोठं दुःख उराशी घेऊन आपल्याला जनतेची सेवा करायची आहे.या तळमळीने आदरणीय विनय कोरे (सावकार) सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी होणारे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान रद्द करण्याचा निर्णय मंत्री विनयजी कोरे साहेबांनी व वस्ताद पै.संदीप पाटील व वारणा कुस्ती कमिटी व सर्व संस्थेचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांनी घेतला आहे. त्यामुळे सर्व कुस्ती शौकिनांना व पैलवान यांना यावर्षी वारणेचे कुस्ती मैदान खेळता येणार नसल्याची खंत पुढच्या वर्षी नक्की भरून काढू असं आश्वासन . विनय कोरे (सावकार) यांनी केले.