जत-मुंचडी मार्गाच्या भेगा दुरूस्तीचे काम सुरू | आतातरी दर्जा ठेवा ; अँड.सुरेश घागरे

0

जत,प्रतिनिधी : विजापूर-गुहागर महामार्गाचे केलेल्या सीमेंट कॉक्रिट काम निकृष्ट झाल्याने जत ते मुंचडी पर्यत या मार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या होत्या.यासंदर्भात संकेत टाइम्स सह स्वा.शेतकरी संघटनेने आवाज उठविला होता.काम न झाल्यास तीव्र आंदोलन इशारा स्वा.शेतकरी संघटनेने दिला होता.








अखेर निवेदनाची दखल घेत या मार्गावरील भेगा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.भेगा  पडलेल्या बाजूचा भाग उखडून काढण्यात येत आहे. त्यात खाली मजबूतीकरण करून पुन्हा कॉक्रिटचा थर करण्यात येणार आहे. अन्य ठिकाणीही मार्गाचे काम करताना दर्जा नियम,मार्गाची रुंदी नियमबाह्यपणे करण्यात आल्याचे आरोप आहेत.त्याशिवाय गटारी व अनेक ठिकाणी कॉक्रिटीकरण दर्जाहीन झाल्याचे आरोप आहेत.दरम्यान,

जत-मुंचडी दरम्यानच्या महामार्गाचे नव्याने केलेले कॉक्रिटीकरणाला मोठ्या भेगा पडल्या होत्या.भविष्यात हा भेगा मोठ्या होऊन अपघात होण्याची भिती होती.आम्ही निवेदन देऊन येथे नव्याने काम करण्याची मागणी केली होती.



Rate Card







वरिष्ठ कार्यालयाने आमच्या निवेदनाची दखल घेत भेगा पडलेला भाग उखडून काढत नव्याने काम करण्यात येत आहे. आतातरी कामात दर्जा रहावा,असे आवाहन स्वा.शेतकरी संघटनेचे नेते अँड.सुरेश घागरे यांनी केले.



जत-मुंचडी रस्त्याचे भेगा पडलेले काम उखडून काढून नव्याने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.