पोलीस पाटील एकीकरण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी सरगर

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी जत तालुक्यातील मोटेवाडी(को.बो.) येथील पोलीस पाटील धनाजी सरगर यांची निवड करण्यात आली.जिल्हा संघटकपदी संखचे पोलीस पाटील सुरेश पाटील,आक्कळवाडीचे पोलीस पाटील,भालचंद्र पाटील यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात
आली. पोलीस ठाणे सभागृहात महाराष्ट्र पोलीस पाटील एकीकरण समितीची बैठक पार पडली.बैठकीस अध्यक्षस्थानी राज्य समन्वयक प्रवीण राक्षे पाटील, दिपक गिरी पाटील, विजय थोरात, ज्ञानेश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत धनाजी सरगर, सुरेश पाटील, भालचंद्र पाटील यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.