भारत बंदला ‌ज‌त‌ राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठिंबा

जत,प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नवे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करत देशाच्या राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मागील 12 दिवसांपासून एल्गार पुकारला असून,मंगळवार ता.8 संपूर्ण देशभर बंद पाळण्यात आला. या आंदोलनास जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.


त्यावेळी तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी,कार्याध्यक्ष अध्यक्ष उत्तम  चव्हाण, जत तालुका उपाध्यक्ष आप्पाराया रेऊर व मच्छिंद्र वाघमोडे,  राष्ट्रवादी विद्यार्थी पार्टीचे पवन कोळी, आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभाग सांगली जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले,रुपेश पिसाळ,जिल्हा उपाध्यक्ष हेमंत खाडे, रमजान नदाफ, हेमंत चौगुले सर, सागर चंदनशिवे, मयूर माने, अमरसिंह मानेपाटील, प्रविण साळे, अक्षय माडे, पंकज संकपाळ, शफीक इनामदार, राजू मुल्ला व अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


भारत बंदला ‌ज‌त‌ राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठिंबा देत तहसीलदारांना तसे पत्र दिले.