डॉ.आंबेडकर उद्यानालगच्या वस्तीचा पाणी प्रश्न सुटला | नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी स्व:खर्चातून बसविली मोटार

जत,प्रतिनिधी : जत‌ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उघान लगतच्या वस्तीमधील बोअरवेल्स बंद होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते.अखेर यांची माहिती मिळताच नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे यांनी स्वखर्चातून मोटार‌ बसवून पाणी पुरवठा सुरू केला.यावेळी भूपेंद्र कांबळे म्हणाले,
डॉ.आंबेडकर उद्यानाजवळील या वस्तीलासाठी असणारी कुपनलिका गेल्या अनेक दिवसापासून बंद होती.यांची परिसरातील काही नागरिकांनी मला माहिती दिली.तात्काळ आम्ही कुपनलिकेची पाहणी करून नवीन मोटार खरेदी करून पाणी पुरवठा सुरू केला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना पाणी उपलब्ध झाले आहे.


जत : डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील वस्ती परिसरातील ‌बंद‌ कुपनलिका सभापती भूपेंद्र कांबळे यांनी स्व:खर्चातून सुरू करून दिली.