आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब जिल्हा उपाध्यक्षपदी हेमंत खाडे

जत,प्रतिनिधी : आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्यच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी हेमंत खाडे यांची  निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, शिकवण समाजापुढे परखडपणे मांडण्याचे कार्य, समाजात स्पष्ट मताने पक्षाचे कार्य करत, पक्षाच्या पडत्या काळात स्थानिक व सोशियल मिडीयाच्या माध्यमातून मांडण्याचे कार्य हेमंत खाडे यांनी केले आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांमध्ये आ.रोहितदादा पवार यांच्याबद्दल खूप आकर्षक आहे.

भविष्यात राष्ट्रवादीचा युवा नेतृत्वाच्या दिशेने असलेली रोहितदादा यांची वाटचाल आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रवादी वर प्रेम करणाऱ्या प्रत्येक घटकांना एकत्रित करण्यासाठी आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्यची स्थापना करण्यात आली आहे.या आ.रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महाराष्ट्र राज्यची जिल्हा कार्यकारिणी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 31 जिल्ह्यामध्ये नियुक्त करण्यात आली आहे.


याच अनुषंगाने सांगली जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यावेळी जतचे हेमंत खाडे यांचे आजवरचे पक्षासाठी व पक्षाचे केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची सांगली जिल्हाध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव मंडले यांनी संस्थापक बंडू जावळे, कार्याध्यक्ष सचिन काळे, प्रदेशाध्यक्ष जयंत भोसले, सरचिटणीस ज्ञानेश्वर गुरव सर, संघटक मंगेशजी काष्टे यांच्याशी चर्चा करून सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी हेमंत खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.