डॉ.आप्पासाहेब भोसले यांची प्राचार्य पदी नियुक्ती

जत,प्रतिनिधी : श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे राजे रामराव महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्यपदी पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आप्पासाहेब भोसले यांची निवड करण्यात आली.महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ.विठ्ठलराव ढेकळे यांची बदली दत्ताजीराव कदम महाविद्यालय,इचलकरंजी येथे  झाल्यानंतर संस्थेने डॉ.आप्पासाहेब भोसले यांची प्रभारी प्राचार्य पदी डॉ आप्पासाहेब भोसले यांची निवड केली.पदभार स्विकारल्यानंतर नूतन प्रभारी प्राचार्य आप्पासाहेब भोसले म्हणाले की,माझी प्रभारी प्राचार्यपदी निवड केल्याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याचा आभारी आहे.संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व गुरुवर्याना सोबत घेऊन विध्यार्थी केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाचा सर्व स्थरांवर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.


यावेळी महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य विठ्ठलराव ढेकळे,श्रीकांत कोकरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय डॉ.शिवाजी कुलाल,रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.के.के.रानगर,प्रा.एम.एच. करेन्नवार,डॉ.मल्लाप्पा सज्जन,डॉ राजेंद्र लवटे,प्रा.युवराज भोसले,प्रा.विजय जाधव,प्रा.हेरवडे प्रा.राजाराम सुतार, आदीजन उपस्थित होते.