संखचे कृषी कार्यालय बनले स्वच्छालय | अधिकारी,कर्मचारी फिरकेनात ; स्वा.शेतकरी संघटनेचे निवेदन

जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथे कृषी विभागाचे मंडल कार्यालय वापर नसल्यामुळे स्वच्छालय बनले आहे.भूमीपुत्र तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे नागरिक मजबूत असलेल्या कार्यालय इमारतीत शौच्छ करत आहेत.पूर्वीचे कृषी मंडल अधिकारी कार्यालय पुन्हा सुरु करावे,अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. 
तसे निवेदन प्रांताधिकारी,विभागीय कृषी अधिकारी यांना दिले आहे.
संख येथे काही वर्षापुर्वी मंडल अधिकारी कार्यालय,अधिकारी,व कर्मचारी उपस्थित असतं.मात्र शासनाच्या निर्णयामुळे येथील कार्यालय मुर्दाड अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कालबाह्य झाले आहे.सध्या येथे नेमणूक करण्यात आलेले कृषी अधिकारी,सहाय्यक कृषीसेवक कार्यालय असतानाही गावातील काही दुकानात बसून कामकाज पाहत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी योजनाच्या लाभापासून वंचित रहावे लागत असल्याचे आरोप आहेत.

तसेच संख ते भिवर्गी रोडला मिळणारा रस्ता पांडोझरी वडापात्रात कृषी कार्यालयाकडून नाला सफाई योजना अंतर्गत नाला सफाई काम केले आहे.त्यात संख ते भिवर्गीला जाणारा रस्ता नाला सफाई करताना खोदला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पंधरा किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. तक्रारी नंतर काही तालुका कृषी अधिकारी यांनी पाहणी करून दिलेल्या आश्वासनावरून हा रस्ता शेतकऱ्यांनी स्व:खर्चातून केला आहे. त्यासाठी मुरूम टाकण्यासाठी 48,500 रूपये शेतकऱ्यांनी खर्च केले आहे.


ठेकेदार,यावर नियंत्रण असणारे  कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.तातडीने येथील कार्यालय वापरात आणावे,नाल्यात‌ घालविलेल्या रस्त्याचा खर्च 15 दिवसाच्या आता द्यावे,अन्यथा कृषी कार्यालयासमोर बेमुदत हलगीनाद आंदोलन करू,असा इशारा निवेदनात दिला आहे.
भिमाशंकर बिराजदार,सिध्दगोंडा बिराजदार,नागनाथ शिळीन,राजकुमार बिराजदार,विठ्ठल कुंभार,परशूराम सबई,नागेश हिरेमठ,कुमार औरादी,प्रकाश कात्राळ,आप्पासाहेब जत्ती,भिमराव बिराजदार आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
वरुणराजा मेहेरबान झाला आणि शेतशिवारात हिरवळ दाटली. पिकेही डोलायला लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. याच दरम्यान चकरी भुंगा, खोडमाशी, शंखीय गोगलगाय, गुलाबी बोंडअळी आदी कीटकजन्य रोगाने आक्रमण केले. रोगाच्या या प्रादुर्भावातून सावरण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज असताना कृषी विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.