अवैध दारूची "झिंग'! | उत्पादन शुल्क विभाग कोमात ; गावठी दारूचे अनेक गावातच कारखाने

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे देशी व विदेशी दारू विक्री जोमात सुरू आहे.काही गावातच थेेेट 
गावठी दारू काढण्याचे कारखाने थाटल्याचे समोर येत आहे. हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक उन्नत्ती करत सर्व नियम ढाब्यावर बसविले आहेत.जत तालुक्‍यातील अवैधरित्या सुरू असलेली दारू विक्री थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली.
तालुक्यातील अनेक वाड्या वस्त्या,व गावात टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर दिवसाढवळ्या गावठी दारूसह,‌सिंदी देशी व विदेशी दारू विक्री सुरू आहे.
तसेच ग्रामीण भागातही अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे.उत्पादन शुल्कचे अधिकारी त्यांना संरक्षण देत आहेत. त्यात नव्याने टपरी, हॉटेल व ढाबा सुरू होताच स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्रीसाठी प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे.
टपरी, हॉटेल व ढाब्याचे हप्ते मिळतात त्या टपरी, हॉटेल व ढाब्यावर नागरिकांच्या तक्रारी आल्यावर केवळ कारवाईचे नाट्य केले जाते. पोलिसच कारवाई करताना तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव सांगतात. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध कोणी बोलत नसल्याने राजरोसपणे किंमतीच्या दुप्पटीने बॉटली विकली जाते. काही हॉटेल व ढाबे चालकांनी वाईन व बियर बारची परवानगी घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला हाताशी धरुन नियम डावलत परवानगी घेतल्याचे आरोप आहेत.महिना पाच हजार रुपयांचा हप्ता.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा खासगी व्यक्ती अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या टपरी, हॉटेल व ढाबे चालकाकडून कमीत कमी पाच रुपयांपासून पुढे रक्‍कम घेेत असल्याचे बोलले जात आहे. त्यात स्थानिक पोलीस व अधिकारी यांचे वेगळे हप्ते असल्याने टपरी, हॉटेल व ढाबे चालक पोलिसांसमोरच दारू विक्री करतात. दारू काचेच्या ग्लासमध्ये न देता स्टीलच्या ग्लासमध्ये दिली जाते. दारू विक्री होत नसल्याचे सांगत आहेत. पोलिसांना ही अवैधरित्या दारू विक्री दिसत नाही, हे नवलच आहे.पोलिसांकडून अवैध धंद्यांना संरक्षण.
टपरी, हॉटेल व ढाब्यावर दारू पिवून मद्यपी रस्त्यातच पडतात. या अवैध दारू धंद्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन होत असून, त्यांचा प्रसंगी मृत्यू होत आहे. व्यसनाधीन पती-पत्नीला मारहाण करुन त्यांचे संसार उद्धवस्त होत आहे.जत व उमदी ठाणे हद्दीत अवैधरित्या दारू धंद्यांना संरक्षण दिले आहे.पोलिसांचे मात्र तोंडावर बोट
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिक दारू धंदे ते पोलीस ठाणे जोरात असा पोलीस अधिकाऱ्यांचा फंडा आहे. दारूच्या व्यसनामुळे भांडणे, भांडणातून गुन्हे आणि गुन्ह्यातून आरोपी तसेच आरोपीकडून रक्कम स्वीकारुन गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जाते. काही अधिकारी व पोलीस वरिष्ठांना हप्ते द्यावे लागत असल्याने पूर्वीपेक्षा अधिक हप्ते वाढवून घेत आहेत. त्यातच मटका, जुगार, वेश्‍याव्यवसाय, भंगार चोरी आदी धंद्यात वाढ झाली. आता तर पोलिसच अवैधरित्या धंदे चालू नसल्याची कबुली देत आहेत.दारू धंद्यांमुळे युवक व्यसनाधीन होवून किरकोळ भांडणातून खुनाच्या घटनेत वाढ होत आहे. तसेच यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिले जात आहे. अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या टपरी, हॉटेल व ढाबे चालकांना पोलिसच संरक्षण देत आहेत. 


उत्पादन शुल्कचे‌ कार्यालय सदा बंद

जत‌ येथे उत्पादन शुल्कचे‌ कार्यालय ‌आहे.मात्र येथील अधिकारी पदाचा‌ पदभार‌ मिरज‌ येथील अधिकाऱ्यांकडे आहे.ते‌ मिरज येथून कारभार हाकतात.जत‌ कार्यालयाकडे कर्मचारी कुठे असतात.याबाबत संशोधन करावे लागते.गेल्या अनेक दिवसापासून हे कार्यालय अनेकवेळा कुलूपबंद‌ असल्याचे समोर आले आहे.