शिंगणापूरमध्ये अर्धा एकर ऊस‌ जळून खाक
जत,प्रतिनिधी : शिंगणापूर ता.जत येथील दादासो तायाप्पा पांढरे यांचा अर्धा गुंठे ऊस‌ विजेच्या ठिनग्या पडल्याने लागलेल्या आगीत जळून खाक झाला.शिंगणापूर येथील दादासो पांढरे यांचा गट नंबर 30 मधील कारखान्याला घालविण्या योग्य अर्धा एकर क्षेत्रात ऊस आहे.बुधवार ऊसाला अचानक आग लागली.त्यात वाळलेल्या पाल्यामुळे आग भडकली संपूर्ण अर्धा एकर ऊस‌ जळून खाक झाला.यात सुमारे पन्नास हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.