शासकीय कार्यालयातच कोरोनाचे नियम कागदावर | मास्क गायब,सोशल डिस्टसिंगचा फज्जा

जत,प्रतिनिधी : जत तहसील कार्यालयात कोरोना नियम पायदळी तुडविले जात असून विविध विभागात मास्क, सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.
कामासाठी आलेल्या नागरिकांना मास्क लावा,सोशल डिस्टसिंग ठेवा म्हणून कोन सांगत नाही.परिणामी विना मास्क नागरिक गर्दी करत आहेत.जत शहरातील शासकीय कार्यालयेच शासनाचे नियम पाळत नसतील तर नागरिकांना आदेश करून काय फायदा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जत शहरातील पंचायत समिती, पोलीस ठाणे,प्रांत कार्यालय,भूमीअभिलेख,
दुय्यम निंबधक, नगरपरिषदेसह सुरू झालेल्या शाळातही मास्क गायब झाल्याचे चित्र असून काही अपवाद वगळता सोशल डिस्टसिंग विषय संपल्याचे चित्र असून घोळके करून विद्यार्थी, नागरिक एकत्र येत असल्याचे चित्र आहे.भविष्यात कोरोनाचा फैलाव वाढला तर जबाबदार कोन असा सवाल उपस्थित होत आहे.


जत तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या सेतू कार्यालयात नागरिकांना कोरोनाची भिती नसल्याचे चित्र सोमवारी होते.