'भारत बंद' संभाजी ब्रिगेडची सांगलीत निर्दशने

जत,प्रतिनिधी : दिल्लीतील किसान आंदोलनाच्या पांठिबासाठी पुकारलेल्या भारत बंदला संभाजी ब्रिगेडने पांठिबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे,शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा,या मागण्याचे निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारने अलीकडेच लोकसभेत कुठलीही चर्चा न होता बहुमत असल्याने कृषीविषयक तीन विधेयक संमत करून घेतलीत. 


राज्यसभेतही कुठलीही चर्चा न होऊ देता आवाजी मतदानाने ती विधेयक पारित करण्यात आलीत.अध्यादेश आणण्यापूर्वी कुठलेही शेतकरी, त्यांच्या संघटना व चळवळीशी या विषयावर चर्चा झाली नाही.लोकसभेत व राज्यसभेत अध्यादेश पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही होऊन या विधेयकांचे कायद्यात रूपांतर
करण्यात आले.मात्र, त्यांतील तरतुदींची चर्चा होत त्यातील संभाव्य परिणामांची चर्चा शेतकरी व त्यांच्या संघटनांत होऊ
लागली होती. त्यानुसार पंजाब व हरियाणातील शेतमाल बाजारातील किमान हमी दराने होणाऱ्या खरेदीच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरत शेतकरी रस्त्यावर उतरले.मात्र, सरकारतर्फे कुठलेही शंका निरसन न झाल्याने मोर्चे, रस्ता रोको, रेल रोको, ट्रॅक्टर रॅल्या झाल्यावर लक्षावधी शेतकरी दिल्लीला पोहोचले. ही विधेयके शेतकऱ्यांची उद्धारक' म्हणून चित्र रंगवले जात असले, तरी या विधेयकामुळे नाडलेले शेतकरी हे मोठ्या उद्योगपतीच्या
दावणीला बांधले जाण्याचीच शक्यता आता देशभरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे.जे काही नवीन कृषी कायदे आहेत,त्यात बऱ्याच त्रुटी जाणूनबुजून ठेवल्या आहेत.अशी अवस्था असल्याने हे कायदे रद्द करावेत,असे निवेदनात म्हणाले.यावेळी अर्पणा खांडेकर,प्रणिता पवार,कौमुदी पाटील,शिवाजी जाधव,श्रेयस नाईक,रशिद शेख,संतोष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.सांगली : संभाजी ब्रिगेडच्या वतीने भारत बंदला पांठिबा देत सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.