बस्तवडे स्फोटप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल

तासगाव : तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील गट नं. 377 मधील डोंगर फोडत असताना झालेल्या भीषण स्फोटाप्रकरणी 8 जणांवर गुन्हा झाला आहे.बेकायदेशिररित्या स्फोटकांचा वापर करुन डोंगर फोडल्याचा वही स्फोटके वापरताना सुरक्षेची कोणतीही उपययोजना न केल्याचा ठपका ठेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल झालेल्यांमध्ये युएसके ॲग्रोचे संभाजी सदाशिव चव्हाण,मनिषा संभाजी चव्हाण,संग्रामसिंह संभाजी चव्हाण,एक अल्पवयीन (सर्व. रा. सिद्धेवाडी, ता.तासगाव),शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे मोहन कलाय्या
जंगम (रा. नेमिनाथनगर, सांगली),
प्रतिक मन्नत स्वामी, इश्वर बामणे, महेश
शिवाप्पा दुडणावर या 8 जणांचा समा
वेश आहे.


याबाबतची फिर्याद सहायक
पोलीस निरीक्षक नितीन केराम यांनी
दिली आहे.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती
अशी, बस्तवडे येथील गट नं.377 मधील विजयसिंह राजे पटवर्धन यांचा डोंगर यूएसके ऍग्रोचे संभाजी चव्हाण व अन्य तिघांनी विकत घेतला आहे.गेल्या काही महिन्यांपासून या डोंगराचे सपाटीकरण करून जमीन तयार करण्यात येत होती.

या सपाटीकरणासाठी ब्रेकर,जेसीबी, डंपर, बोअर ब्लास्टिंगच्या मशीनचा वापर करण्यात येत आहे. सुमारे 40 हुन अधिक मजूर याठिकाणी दररोज काम करीत आहेत संभाजी चव्हाण यांनी या कामाचा ठेका शिवशक्ती कन्स्ट्रक्शनचे मोहन जंगम यांना दिला आहे.गेल्या काही महिन्यांपासून शिवशक्ती कन्स्ट्रक्शनने या डोंगरालाच सुरुंग लावण्याचे काम सुरू केले आहे.शेकडो फूट उंचीचा डोंगर सुरुंग लावून उद्भवस्त करण्यात येत आहे.