जत तालुक्यातील संजय गांधी 63,श्रावणबाळ 28 प्रस्तावास मंजूरी

जत,प्रतिनिधी : जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 91 प्रस्ताव मंजूरी देण्यात आली.त्यात संजय गांधी योजनेतून 63,श्रावण बाळ योजनेतून 28 जणांना लाभ प्रस्ताव मंजूर करणेत आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नाना शिंदे यांनी दिली.जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीची पहिली बैठक 
संपन्न झाली.या बैठकीत आ.विक्रमसिंह सावंत यांनी मार्गदर्शन केले.सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.समिती अध्यक्ष श्री.शिंदे,सदस्य राम पाटील, उत्तम चव्हाण,गणेश गिड्डे,विजय चव्हाण उपस्थित होते.तहसीलदार सचिन पाटील,नायब तहसिलदार संजय पवार यांनी सभेचे कामकाज पाहिले. तालुक्यातील जास्ती जास्त वंचित नागरिकांना विविध योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे या बैठकीत ठरले. 

जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष नाना शिंदे यांचा आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.