सांगलीत 3 मटका‌ अड्ड्यावर पोलीसांची धडक कारवाई

0



सांगली : सांगली शहर पोलीस ठाणे हदीमध्ये अवैध धंदे मटका, जुगार आणि बेकायदा असणारे धंदे यांचा शोध घेवून कडक कारवाई करणेबाबतचे आदेश  पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके,पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना दिले आहेत.

त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेचे मा.पो.नि. अजय सिंदकर यांनी पो.ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील स.पो.नि. निलेश बागाय, पो.हे.कॉ/१६२६ दिलीप जाधव, पो.हे.कॉ/४४० संदिप पाटील,पो.हे.कॉ/५४८ शिंदे, पो.हे.फॉ/१३५८ दोरकर, पो.ना/२०७७ झाकीर काझी, पोशि/२३६० विक्रम खोत, पोशि/२१३१ अक्षय कांबळे असे खास पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश या पथकाला दिले होते.

त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी यांनी खास बामतीदारामार्फत बातमी काढून दिनांक १६/१२/२०२० आणि १७/१२/२०२० रोजी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकुण ३ कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १) शास्त्री चौक याठिकाणी बासू ऊर्फ सुनिल दिलीप वैद्य (वय, ३९ वर्षे रा. कल्याणकर प्लॉट काळी वाट ४ थी गल्ली सांगली) हा एजंट मटका घेताना मिळून आला, त्याचा मालक मटकाबकी नितीन यल्लाप्पा दोडमणी रा. गोसावी गल्ली खणभाग आणि लक्ष्मण जाधव रा. गोसावी गल्ली हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच गणेश चंद्रकांत नागे वय, २५ रा. जामवाडी सांगली हा एजंट पटेल चौक या ठिकाणी मटका घेताना मिळून आला.

Rate Card

त्याचा मालक मटकाबुकी पंकज भोसले रा. जामबाडी आणि संजय महाजन रा. जामवाडी सांगली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे अरबाज नजिर कलेगार (वय. २० रा.दत्तनगर जॅकवेल रोड सांगली) हा एजंट मटका घेताना मिळून आला. त्याचा मालक मटकाबुकी अमित गर्जेपाटील रा. खणभाग हा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या तिन्ही कारवाईमध्ये एकूण रोख रक्कम १२,०७५/- रू, एक मोबाईल आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यामध्ये मटकाबुकी नितीन यल्लाप्पा दोडमणी रा. गोसाची गल्ली खणभाग,लक्ष्मण जाधव,गोसावी गल्ली तसेच मटकाबुकी अमित गर्जेपाटील रा. खणभाग हे फरार असुन त्यांचेवर यापुर्वी मटका जुगाराचे विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.अधिक‌ तपास दिलीप जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.