जतेत सुसज्ज बसस्थानक कधी.? | 2 लाख लोकांचे दळणवळणाचे साधन असलेले स्थानक समस्याग्रस्त

0



जत,प्रतिनिधी : जिल्ह्यातील उत्पन्नात पंचवीस टक्के उत्पन्न असणाऱ्या जत बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. कालबाह्य पत्र्याची सेड,कार्यालये, कचऱ्यांचे ढिग,अतिक्रमणामुळे बसस्थानकाला अवकळा आली आहे. आगार व्यवस्थेला सुधारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांची गरज बनली आहे.अत्याधुनिक बसस्थानक हा तालुक्यातील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा विषय कधी पूर्ण होणार? हा प्रश्‍न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे.116 गावाचे दळणवळण साधन असणारे जत बसस्थानक खरेतर यापुर्वीच सुसज्ज असणे गरजेचे होते. 







मात्र बसस्थानक उभारणीस राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. तालुक्यातील प्रंचड विस्तारित गावासह राज्यातील अनेक भागात जत आगाराच्या बसेस लाखो रुपयांची कमाई करतात. जिल्ह्यातील पंचवीस टक्के उत्पन्न जत आगारातून मिळते. त्याप्रमाणात जत बसस्थानकातून सुविधा मिळत नाहीत. जिल्ह्यातील सर्व बसस्थानके सुसज्ज असताना जत अजूनही जुन्या काळात असल्याचा भास होत आहे. स्थानकातील प्रवाशी शेड, संरक्षण भिंत,स्वच्छता,पाणी पुरवठा, स्वच्छता गृहाची समस्या कायम आहे.

Rate Card






आगार व्यवस्थापकाचा बंगला परिसरात अस्वच्छता आहे. बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. सायंकाळ होताच डासाचे सामाज्य असते.चोरट्याचा वावर बसस्थानक परिसरात असल्याने प्रवाशाच्या वस्तूची सुरक्षिता धोक्यात आहे. अशा अनेक गर्धेत सापडलेल्या नवसंजिवनी देण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.