ग्रामपंचायत सरपंच आरक्षण 16 डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देशसांगली : सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण 699 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निश्चित करणेत आलेले आहे. जिल्ह्यामधील एकूण 699 ग्रमपंचयतीबाबतीत सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी तालुक्यामधील एकूण ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंच आरक्षण काढणेसाठी संबधीत उपविभागीय अधिकारी यांना पर्यवेक्षीय करणेसाठी तसेच संबधित तहसिलदार यांना आरक्षण काढणेसाठी प्राधिकृत करणेत आलेले आहे. सदरचे आरक्षण हे दिनांक 16 डिसेंबर 2020 पर्यंत पुर्ण करणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.तसेच सदरचे आरक्षण संबधित तालुकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमातील तरतूदीनुसार करणेबाबत कळविणेत आलेले आहे. 
सन 2020 – 2025 साठी तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण खालील प्रमाणे मिरज तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 8 (सर्वसाधरण -4 व महिला -4), अनुसूचित जमातीसाठी 1 (सर्वसाधारण), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 17 (सर्वसाधारण-8 व महिला – 9) खुल्या प्रवर्गासाठी - 38 (सर्वसाधारण – 19 व महिला 19) तासगाव तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 7 (सर्वसाधरण -3 व महिला -4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 18 (सर्वसाधारण-9 व महिला – 9) खुल्या प्रवर्गासाठी - 43 (सर्वसाधारण – 21 व महिला 22) कवठेमहांकाळ तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 8 (सर्वसाधरण -4 व महिला -4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 16 (सर्वसाधारण-8 व महिला – 8) खुल्या प्रवर्गासाठी - 35 (सर्वसाधारण – 17 व महिला 18) 
जत तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 14 (सर्वसाधरण -7 व महिला -7), अनुसूचित जमातीसाठी 2 (सर्वसाधारण -1 व महिला -1),  नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 31 (सर्वसाधारण-15 व महिला – 16) खुल्या प्रवर्गासाठी - 69 (सर्वसाधारण – 34 व महिला 35) 
विटा तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 9 (सर्वसाधरण -4 व महिला -5), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 17 (सर्वसाधारण-8 व महिला – 9) खुल्या प्रवर्गासाठी - 38 (सर्वसाधारण – 19 व महिला 19) आटपाडी तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 7 (सर्वसाधरण -3 व महिला -4), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 15 (सर्वसाधारण-7 व महिला – 8) खुल्या प्रवर्गासाठी - 34 (सर्वसाधारण – 17 व महिला 17) 
कडेगाव तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 6 (सर्वसाधरण -3 व महिला -3), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 15 (सर्वसाधारण-7 व महिला – 8) खुल्या प्रवर्गासाठी - 33 (सर्वसाधारण – 16 व महिला 17) पलूस तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 4 (सर्वसाधरण -2 व महिला -2), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 9 (सर्वसाधारण-4 व महिला – 5) खुल्या प्रवर्गासाठी - 20 (सर्वसाधारण – 10 व महिला 10)
 वाळवा तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 11 (सर्वसाधरण -5 व महिला -6), अनुसुचित जमाती – 01 (महिला) नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 26 (सर्वसाधारण-13 व महिला – 13) खुल्या प्रवर्गासाठी - 56 (सर्वसाधारण –28 व महिला 28) विटा तालुक्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित पदे अनुसूचित जातीसाठी - 9 (सर्वसाधरण -4 व महिला -5), नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी - 25 (सर्वसाधारण-13 व महिला – 15) खुल्या प्रवर्गासाठी - 57 (सर्वसाधारण – 28 व महिला 29)