जत तालुक्यात सहा गावात सात रुग्ण

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात बुधवारी सहा गावात सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.तर जत शहरात मंगळवारी शून्य तर बुधवारी एकच रुग्ण असे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले आहे.

आतापर्यत 199 दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1872 झाली आहे.बुधवारी वाळेखिंडी, जत,निगडी खु.,माडग्याळ येथे प्रत्येकी एक तर माडग्याळ येथे 2 असे सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात गेल्या तीन दिवसात एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.