जत तालुक्यात पुन्हा अवैध धंदे बहरले

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात भागात पुन्हा अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.लॉकडाऊन मध्ये बंद असलेले जत तालुक्यातील गावागावात पुन्हा अवैध धंदे चालकांनी डोके वर काढले आहे.गावठी दारूचे अड्डे फुलले आहे.त्याशिवायमटका,जुगार,सिंदी,वाळू,गांज्या तस्करी वाढली आहे.पोलीस यंत्रणेचा छुपा पांठिबा या अवैध धंद्यांना बंळ देत आहेत.नव्यानेे अधिकारी अवैध धंदे बंद केल्याचा एकीकडे दावा करत असताना स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्थपुर्ण आर्शिवादाने बेधडक दारु,तीनपानी जुगार,मटका,गांज्या,वाळू तस्करी,सिंदी,गावठी दारूचा गावागावात महापूर वाहत आहे.नेमके कुठल्या गावात अवैध धंदे बंद आहेत.हा संशोधनाचा मुद्दा आहे.

गावठी दारूचा महापूर


तालुक्यातील अनेक गावात  सिंदी,गावठी दारूचा महापूर आला आहे.गावागावात बंद झालेली सिंदी,गावठी दारू पुन्हा सुरू झाली आहे.याकडे पोलीसांचे दुर्लक्ष का होत आहे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून लुट


जत तालुक्यात गेल्या काही दिवसात विविध गुन्हे उघडीस आले आहेत.अनेक गुन्ह्यात थेट आरोपींना अटक न करता अभय देण्यात येत आहे. तपासअधिकारी गुन्हेगारांना बंळ देत असल्याची चर्चा असून आरोपीच्या सोयीनुसार अटक करून न्यायालयात हजर करण्याचे प्रकार होत असल्याचे आरोप आहेत.तर विविध गुन्ह्यात संबंध नसतानाही काही जणांना पोलीस ठाण्यात बोलवून गुन्ह्यात अडकविण़्याची भिती दाखवत लुट करण्यात येत असल्याची चर्चा असून अशा प्रकारात अनेकांचे हात ओले झाल्याचे बोलले जात आहे.काही गुन्ह्यात वर्षाचा कालावधी होऊनही आरोपींना अभय देण़्यामागचे गौडबंगाल असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हेगारांचा वानर

विविध गंभीर गुन्हे दाखल असलेले काही गुन्हेगारांचा वावर पोलीस ठाण्यात होत असल्याचे आरोप आहेत.असे गुन्हेगार अन्य काही गुन्ह्यात आरोपींना वाचविण्यासाठी मदत करतात,तर अनेकवेळा तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप आहेत.