कोरोना संसर्ग: शासकीय कार्यालयांमध्ये बेफिकिरी वाढली

जत,प्रतिनिधी : कोरोना संसर्गाचा धोका अजून टळला नाही, पण जणूकाही कोरोनाचे संकट संपल्यासारखी परिस्थिती  शहरात पहावयास मिळत आहे. कोरोनाबाबत काळजी घेताना यापूर्वी शासकीय कार्यालयात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी होत होती.
मात्र आता अशी तपासणी होत नसल्याचे दिसून येत आहे.जत शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच यापूर्वी सर्वांची तपासणी केली जात होती. कार्यालयात हजर होणाऱ्यांशिवाय कामानिमित्त येणाऱ्यांचीही तपासणी होत होती. मात्र आता संपूर्ण चित्र उलटे दिसून येत आहे.नगर परिषद कार्यालयात येणाऱ्यांची कोणतीच तपासणी होत नव्हती. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वांवरच बंधने घालून दिली आहेत.
परंतु आता मात्र शासकीय कार्यालयातच उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.काही शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला असता अनेक ठिकाणी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीच सुविधा नसल्याचे आढळून आले.जतेतील उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,पंचायत समिती,पोलीस ठाणे येथे हेच चित्र दिसून आहे.