बळीराजा पुन्हा संकटात; ढगाळ वातावरणाचा परिणाम

जत,प्रतिनिधी :  जत तालुक्यात शेतकरी आंतरपीक म्हणून तूर मोठ्या प्रमाणात पेरणी करतात.हाजारो हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात येते. तुरीचे पीक फुलोऱ्यावर असताना ढगाळ वातावरण आहे.यामुळे तूर पिकांवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे.खरीप हंगाम शेतकर्‍यांना रडविणारा ठरला आहे.ढगाळी वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.


नोव्हेंबर महिन्यात वातावरणात बदल झाल्याने त्याचा परिणाम तुरीवर होत आहे.दमट वातावरणामुळे थंडी गायब झाली. हवामान बदलाचा तूर पिकांना फटका बसला आहे. दरम्यानच्या कालावधीत अवकाळी पावसानेही हजेरी लावली. ढगाळी वातावरणासह धुवारीने तुर पिकांचा फुलोराही गळून पडत आहे. तूर पिकाला लागलेल्या कोवळ्या तुरीच्या शेंगात अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळत आहे.