आंवढीत वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त | दहा लाखाचा मुद्देमाल जप्त ; जत पोलीसांची कारवाई

जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर जप्त करत 10 लाख तीस हजार रूपयाचा मुद्देमाल जत पोलीसांनी जप्त केला.याप्रकरणी उमाजी शिंदे,अंकुश शिंदे (रा.आंवढी)यांना पोलीसांनी अटक केली आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,आंवढीतील सोळकेवाडी नजिक उमाजी शिंदे व अंकुश शिंदे हे हायवा टिपर(एमएच 10,झेड 4806) या गाडीतून वाळू वाहतूक करत असताना जत पोलीसाच्या पेंट्रोलिंग पथकाला आढळून आल्यांने टिपरसह दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.ट्रिपरसह तीन वाळू जप्त करत 10 लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस कर्मचारी दिलीप राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवैध गौणखनीज वाहतूक,अवैध वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पो.ना.प्रविण पाटील करत आहेत.


दरम्यान आंवढीतील वाळू तस्करी प्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने आंवढी-सोणंद मार्गावर बेकायदा वाळू साठा केलेल्या ठिकाणी छापा टाकत दहा ब्रास वाळू जप्त करत ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी अज्ञाताविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार सचिन पाटील यांच्या आदेशावरून तलाठी सागर भोसले,आण्णा काळे यांनी ही कारवाई केली.आंवढी ता.जत येथे बेकायदा साठा केलेला वाळू जप्त करण्यात आली.