संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ डॉ.रविंद्र आरळी जत‌ तालुक्यातील पदवीधराच्या‌ घरापर्यत

जत,प्रतिनिधी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ डॉ.रविंद्र आरळी यांनी जत‌ तालुक्यातील पदवीधराच्या घरोघरी जात संग्राम देशमुख यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.
जत तालुक्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचार्थ डॉ.आरळी यांनी शुक्रवार,शनिवारी विविध ठिकाणी बैठकाही घेतल्या आहेत.भविष्यातील विकासात्मक कामासाठी भाजपची गरज असून विधान परिषद,विधानसभेत भाजपाचे हात बळकंट करण्यासाठी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील भाजपचे दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा,असे आवाहनही डॉ.आरळी यांनी केले.