गँसचा स्फोट,घर जळाळेआंसगीतुर्क येथील घटना ; तीन लाखाचे नुकसान

जत,प्रतिनिधी : आसंगी तुर्क (ता.जत) येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या राहत्या घरात अचानक गॅस स्फोट होऊन लागलेल्या आगीत संसारउपयोगी साहित्यासह सोने,रोख रक्कम,धान्ये जळून खाक झाले.बुधवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीत सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. 


आसंगी तुर्क पासून एक किलोमीटर अतंरावर भौरवा ईश्वर पुजारी यांचे राहते  पत्रा वजा छप्पराच्या घर आहे.या घरालगतच त्यांच्या नवीन घराचे बांधकाम करण्यात आले आहे.त्यांच्या शेजारील जागेत स्वच्छता करण्याचे काम सुरू होते.त्यादरम्यान त्यांच्या जून्या घराला अचानक आग लागली.आगीमध्ये घरातील गँस स्पोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली.

त्यात संसासउपोयगी साहित्यासह रोख रक्कम,धान्य जळाले आहे.घटनास्थळी गाव कामगार तलाठी डी.वाय.काबंळे यांनी पंचनामा केला असून पंचनाम्यानुसार घरातील 4 पोती ज्वारी,2 पोती गहू,1पोती बाजरी,तीन तोळे सोने, शिलाई मशिन 1,रोख 83 हजार रूपये,महत्वाची कागदपत्रे असा एकूण रक्कम 2 लाख 61 हजाराचे नुकसान झाले आहे.


आंसगीतुर्क ता.जत येथे गँस स्फोट होऊन घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले आहे.